भडगांव येथे मराठा समाज वधुवर परिचय मेळावा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I नुकताच अखिल भारतीय मराठा समाजाचा वधुवर परिचय मेळावा २५ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती भडगांव पेठ येथे उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्यास उद्घाटक व प्रमुख सत्कार मुर्ती म्हणून जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खंडवा लोकसभा खासदार ज्ञानेश्वर गुंजाळ पाटील, जळगाव लोकसभा खासदार उन्मेष दादा पाटील, पाचोरा भडगाव चे आमदार किशोर अप्पा पाटील, माजी पालकमंत्री तथा जळगाव जिल्हा बॅकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, जळगाव जिल्हा बॅकेच्या संचालिका सौ जनाबाई गोंडू महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, अखिल भारतीय मराठा समाजाचे अध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती व विद्यमान नगरसेवक तथा उपाध्यक्ष नगर नियोजन समिती सुरत महानगरपालिका सोमनाथ भाऊ मराठे, सुरत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोदजी नरवाडे, सुरत क्षत्रिय मराठा कल्याण ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष मनोज यशवंत पवार, उपाध्यक्ष पावभा हिरामण मराठे, नंदुरबार नपाचे उपनगराध्यक्ष रविभाऊ पवार, माजी उपसभापती सभापती श्रीमती सुरेखाताई अनिल पाटील, नगरसेविका श्रीमती संगीता ताई मराठे, गणेश भाऊ चव्हाण, माजी उप सभापती देवदास आनंदा मराठे, भगवान तलवारे, विद्यमान सचिव मनोज मराठे, जेष्ठ संचालक तथा माजी सचिव पी. के. पाटील परिचय पुस्तिकेचे संपादक तथा समाजाचे संचालक चिंतामण पाटील, व सर्व विद्यमान संचालक, उपाध्यक्ष सचिव, सहसचिव कार्याध्यक्ष, सहकार्याध्यक्ष व माजी अध्यक्ष, माजी सचिव व माजी संचालक, गावपातळीवरील पुरुष, महिला, युवा अध्यक्ष उपस्थित होते.

या परिचय मेळाव्यात शेकडो मूला- मुलींनी आपले परिचय पत्र भरुन दिले व स्वतः हुन आपला परिचय करून दिला. यावेळी साडेचार ते पाच हजार समाज बांधव उपस्थित होते.

सर्व प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर समाजाचे संचालक तथा परिचय पुस्तिकेचे संपादक चिंतामण पाटील यांनी स्वागत प्रवचन करीत उपस्थित मान्यवर व समाज बांधवांचे स्वागत केले. प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ मराठे यांनी केले.
त्याचप्रमाणे उपस्थित उद्घाटक व सत्कार मुर्ती आमदार किशोर अप्पा पाटील यांनी भडगांव येथील मराठा समाज मंगल कार्यालयासाठी २५ लाख व तारखेडा येथील मंगल कार्यालय साठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले. तर खासदार उन्मेष दादा पाटील यांनी भडगांव येथील मंगल कार्यालय साठी १० लाख रुपये निधी देणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी उपस्थित समाज बांधवांनी भडगांव येथील मंगल कार्यालय साठी रोकड स्वरुपात सात लाख नऊ हजार रुपये देणगी दिली .

हा वधुवर परिचय मेळावा घेण्याची जबाबदारी पाचोरा भडगाव चाळीसगाव परिसराचे संचालक चिंतामण पाटील यांनी स्विकारली होती. त्यांना भडगांव व तारखेडा येथील समाज मंडळाने मोलाचे सहकार्य केले. तसेच भडगांव येथील समाज मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र मराठे, व तारखेडा येथील समाज मंडळाचे अध्यक्ष अनिल मराठे यांच्या सह संतोष नरवाडे, वाल्मिक काळे, मोतीलाल नरवाडे, शिवाजी नरवाडे, हरीभाऊ काळे, गोविंदराव नरवाडे,ब्रिजलाल काळे, त्र्यंबक सदाशिव पाटील,रामचंद्र तात्या पाटील, गोविंदा पाटील, लक्ष्मण पाटील, जनार्दन पाटील, रावसाहेब पाटील, नगराज पाटील, पांडुरंग ओंकार मराठे, रोहिदास मराठे, नामदेव शिंदे, रायबा पाटील, एल. एस. पाटील सर किशोर पाटील फौजी यांच्या सह असंख्य समाज बांधवांनी मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

शेवटी आभार मराठा समाजाचे उपाध्यक्ष अॅड. उमेश महाजन यांनी मानले. तर सुत्रसंचालन किशोर पवार सर, व महेन्द्र मराठे सर, व कैलास पाटील सर यांनी व्यवस्थित पणे पार पाडले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like