डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात पेडियाट्रिक सर्जरी दिवस साजरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २९ डिसेंबर हा जागतिक पेडियाट्रिक सर्जरी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी या दिनाचे औचित्य साधत पेडियाट्रिक सर्जन्सचे महत्व आणि रुग्णालयात पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांच्याद्वारे दिली जाणार्या उत्कृष्ठ सेवेबद्दल अभिनंदन करुन जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही यानिमित्ताने केले.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत केक कापून जागतिक पेडियाट्रिक दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.पाटील यांनी शुभेच्छा देवून पेडियाट्रिक सर्जनचे महत्व विशद केले तसेच त्यांना सहाय्य करणार्या भुलरोग तज्ञांच्या टिमचेही कौतुक केले. याप्रसंगी रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ.दिपक अग्रवाल, इएनटी विभागप्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल यांच्यासह निवासी डॉक्टर, नर्सिंग स्टाफची उपस्थीती होती. सन २०१४ पासून रुग्णालयात पेडियाट्रिक सर्जनची सेवा रुग्णांच्या हितास्तव उपलब्ध करुन दिली आहे.

याप्रसंगी रुग्णालयात कार्यरत पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांनी पेडियाट्रिक सर्जन या विद्याशाखेबद्दलची सविस्तर माहिती दिली. ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांवर शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. जन्माला आल्याबरोबरच बाळाला जर काही व्याधी असेल तर त्यांच्यावर वेळीच उपचार झाले तर बाळाचे पुढचे आयुष्य सुकर होते. यात जन्म: अन्ननलिकेची जागा तयार नसेल, शी ची जागा नसेल किंवा हर्निया, हायड्रोसिल, फूफुसांसह आतड्यांचे विकार अशा विविध आजारांवर येथे शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच काही वेळेस बाळ आईच्या पोटात असतांनाही बाळावर सर्जरी केली जाते. बाळावर शस्त्रक्रिया करतांना पेडियाट्रिक सर्जन्सबरोबरच न्यूनॅटोलॉजिस्ट व भुलरोग तज्ञांचेही मोलाचे योगदान असते. तरी नवजात शिशूंसह १८ वर्षापर्यंतच्या मुलांना काही आरोग्याच्या तक्रारी असल्यास शस्त्रक्रियेची गरज असल्यास वेळीच रुग्णालयात येवून उपचार घ्यावे असे आवाहन यावेळी पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांनी केले.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like