रेल येथे वृद्ध महिलेचा कान कापून दागिने लांबवीले

खान्देश लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांने वृध्द महिलेचे कान कापून १० ते १२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना धरणगाव तालुक्यातील रेल येथे घडली असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल गावातील रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील (वय-७०) ह्या गावातील मंगल नथ्थू पाटील या राहत असून २९ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्याकन्हया घरात अज्ञात चोरटा घुसला. दरम्यान, विमलबाई पाटील या खाटीवर झोपलेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने त्याच्या घरात घुसून त्यांच्या कानातील सोन्याचे किल्लू असल्याने त्याने थेट वृध्द महिलेचा कानच कापला. तसेच वृध्द महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाला. दरम्यान, सकाळी ९ वाजले तरी आजी उठल्या नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या महिला घरी गेल्याने हा प्रकार उघडकीला आला.
जखमी झालेल्या वृध्द महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले, अमळनेर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पाळधी आऊट पोस्टचे गणेश बुवा, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम