जळगावातून एकाची दुचाकी लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I जळगाव शहरातील आनंद नगर परिसरात श्री स्वामी समर्थ केंद्राच्याजवळ दुचाकी चोरून दिल्याप्रकरणी बुधवार 28 डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील आनंदनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ गजानन प्रभाकर सोनार वय 50 हे वास्तव्यास आहेत. सोनार यांनी 22 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या स्वामी समर्थ केंद्राजवळ उभी केली होती. दुसऱ्या दिवशी 23 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उभी केलेली दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने अखेर पाच दिवसानंतर गजानन सोनार यांनी रामानंदनगर पोलीसात तक्रार दिली .या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like