रोटरी वेस्टतर्फे 30 दिव्यांगाना प्रवासी बॅगचे वितरण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I येथील मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे 30 दिव्यांग (अंध) व्यक्तींना प्रवासी बॅगचे रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष गनी मेमन, अनिल कांकरिया, डाॅ.राजेश पाटील, विनोद बियाणी, डॉ.सुशीलकुमार राणे, योगेश भोळे यांच्या हस्ते व अध्यक्ष सुनील सुखवाणी व मानद सचिव विवेक काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.

 

या प्रवासी बॅग अनिल कांकरिया यांच्या प्रयत्नामुळे अमळनेर येथील स्वादिष्ट नमकीन यांनी उपलब्ध करुन दिल्या. कार्यक्रमास रोटरी वेस्टचे संजय इंगळे, विजय शामनानी, शैलेश काबरा, बबलू भोळे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक अध्यक्ष सुनील सुखवानी यांनी केले. गनी मेमन यांनी मनोगत व्यक्त केले. डाॅ. राजेश पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like