चाकूचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । शहरातील मामाजी टॉकीज परीसरात चाकूच्या धाकावर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणार्या संशयीतास शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोनू रामेश्वर पांडे (28, मामाजी टॉकीजजवळ, जुना सातारा, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
रविवार, 1 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संशयीत सोनू पांडे हा मामाजी टॉकीज परीसरातील साजन वडेवाले समोर चाकू बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी संशयीतांच्या मुसक्या बांधल्या. नाईक जाकीर मन्सुरी यांच्या फिर्यादीनुसार संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय मोहम्मदवली सैय्यद करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम