भुसावळात विवाहितेचा छळ ; ५ जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । शहरातील पंचशील नगरातील विवाहितेने माहेरून तीन लाख रुपये न आणल्याने तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह पाच संशयीतांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सताशू वैभव घाटविसावे (21, शनीमंदिर, पंचशील नगर, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, माहेरून तीन लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांनी शारीरीक मानसिक छळ करीत मारहाण केली. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी आल्या व त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून पती वैभव श्रावण घाटविसावे, सासू सरीता श्रावण घाटविसावे, सासरे श्रावण रोहिदास घाटविसावे, नणंद पल्लवी श्रावण घाटविसावे, आतूसासे अक्का (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुमन राठोड करीत आहेत.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like