भडगाव येथे दुकान फोडले ; ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । भडगाव शहरातील पारोळा चौफुली जवळ असलेले एका दुकानदाराचे दुकान फोडून दुकानातून ४५ हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पन्नेसिंग भीमसिंह राजपुरोहित (वय-४२) रा. कराब रस्ता भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पारोळा चौफुली जवळ मा भवानी बिकानेर स्वीट्स नावाचे दुकान आहे. १ जानेवारी ते २ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुकानातील ४५ हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दुकानदार पन्नेसिंह राजपुरोहित यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास पाटील करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like