चाळीसगावात हद्दपार आरोपीला पकडले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी आदेशाचा भंग करून बेकायदेशीरपणे चाळीसगाव बस स्थानकाच्या पाठीमागे फिरत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहे.

शहरातील लक्ष्मीनगर येथील अक्षय भानुदास पाटील (वय-२५) या तरुणाला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. . मात्र सदर इसम २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बस स्थानकाच्या पाठीमागील एका पान टपरीच्या आडोशाला फिरत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातली. तुम्हाला जे करायचा ते करून घ्या. मी पोलीस स्थानकाला येणार नाही. असे सांगून पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिक पोलिस बळ बोलावून त्याला ताब्यात घेतले. व पोकॉ दिपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like