अमळनेरातून एकाची दुचाकी लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । अमळनेरात शहा आलम नगरातून तरुणाची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमवारी २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, इमरान खान हबीब खान पठाण (वय-३०) रा. शहा आलम नगर, अमळनेर हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून आपला उतरनिर्वाह करतो. कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीएच ६१५८) क्रमांकाची दुचाकी आहे. या दुचाकीवरून तो कामावर जेजा करत असतो. १ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची दुचाकी त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सोमवारी २ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता समोर आली. त्याने दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like