तब्बल ६ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला भडगाव तालुक्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. चाळीसगाव पोलीस ठाण्यातत्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे . पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुरनं ९७/२०१७ भादवि कलम ४२०, ४०६ अन्यवे संशयित आरोपी भगवान भिकन उर्फ भिका सोनवणे (वय-३४) रा. पिंप्रीहाट ता. भडगाव ह.मु. महादेव डिंडोली ता. उधना (गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. दरम्यान, संशयित आरोपी भगवान सोनवणे हा बसने भडगाव येथे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकातील सपोनि जालिंदर पळे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई करत संशयित आरोपी भगवान सोनवणे याला पिंप्रीहाट बसस्थानक येथे बसमधून उतरताचा ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like