सामाजिक न्याय विभाग स्थापना दिन कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून १५ ऑक्टोंबर, १९३२ रोजी करण्यात आली होती. सदर विभागास १५ ऑक्टोंबर, २०२२ रोजी ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जळगाव यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांच्या हस्ते कु. अभिषेक दिपक चौधरी, कु.निकीता दत्तात्रय सोनवणे, कु.जतीन संजय तायडे, कु.जयेश संजय कोळी या विदयार्थ्यांना ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास सहाय्य्क आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव या कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. असे सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बी.यु.खरे जळगाव यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like