पॅजो रिक्षा आणि दुचाकीला कारची धडक ; ३ जण जखमी
खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | भरधाव जाणाऱ्या कारने पॅजो रिक्षा आणि दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद टोल नाक्याजवळील रेल्वे उड्डाण पुलावर घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव ते भुसावळ रस्त्यावरील नशिराबाद गावच्या पुढे असलेल्या टोल नाकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७०५५) वरील चालकाने पुढे जात असलेल्या रिक्षा (एमएच १९ बीएम ५९९२) आणि दुचाकी क्रमांक (एमपी ४६ एमटी २७९९) यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षामधील शेख अलीमुद्दीन शेख यासीन रा. शिवाजी नगर, जळगाव यासह दुचाकीस्वार व महिला असे एकूण ३ जण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर कारचालक हा घटनास्थळाहून पसार झाला होता. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नशिराबाद पोलीस स्टेशनला शेख अलीमुद्दीन शेख यासीन यांच्या फिर्यादीवरून कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७०५५) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार संजय जाधव पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम