शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे जल्लोषात स्वागत
खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे जिल्ह्यातील युवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ६ वाजता आगमन झाले. यावेळी त्यांचे जळगाव जिल्ह्यात शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत , महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी स्वागत केले.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या स्वागत प्रसंगी नगरसेवक सचिन पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, शिवसेना प्रसिद्ध प्रमुख उमेशदादा चौधरी, शिवसेना महिला आघाडीच्या मंगलाताई बारी, निळूताई इंगळे, मनीषाताई पाटील, नीताताई सांगळे, विमल ताई सांगळे, संजयजी सांगळे, जलगाव लोकसभा युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख प्रीतम शिंदे, ऋषिकेश देशमुख, शैलेशदादा काळे, शोएब खाटीक, लोकेश पाटील, मतीन सय्यद, आदी शिवसैनिक – युवासैनिक उपस्थितीत होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम