चिंचोलीच्या तरुणाची फसवणूक ; १ लाख ९० हजारांचा गंडा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | एका तरुणाच्या बँक खात्यातून १ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे समोर आला असून याप्रकरणी रविवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील प्रमोद नामदेव पाटील (वय-३९) हे खाजगी नोकरी करतात. २७ रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांच्या मोबाईल नंबरवर एका अनोळखी नंबरवरून युनो केवायसी अपडेट करण्यासंदर्भात लिंक पाठवण्यात आली होती. त्यांनी ती लिंक ओपन केल्यानंतर दिलेल्या फॉर्ममध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईलवरील ओटीपी नंबर भरला काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर १ लाख ९० हजार रुपये याचा व्यवहार झाल्याचे समोर आले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like