जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | येथील शनिपेठ परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाठविल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गीताई नगरात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह राहते. २८ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी दिसून आली नाही, तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून आली नाही, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी रात्री आठ वाजता शनिपेठ पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like