सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमीत्त गोदावरीच्या विविध संस्थामध्ये अभिवादन
खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे सोमवार दि.२१ मे रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्यासह स्टुंडट सेक्शनमधील कर्मचारी वर्ग उपस्थीत होता. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला उजाळा देत हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देखिल साजरा केला जातो असे सांगीतले. सोबतच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील रुग्णालय, सावदा व भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, गोदावरी सीबीएसई स्कुल, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, विधी व विज्ञान महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ.उल्हास पाटील होमियोपॅथी,डॉ. गुणवंतरावर सरोदे आयुर्वैद महाविद्यालय, हरीभाउ जावळे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय, डॉ.वर्षा पाटील इन्स्टीटयुट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तसेच फिजीयोथेरपी महाविद्यालयातही अभिवादन करण्यात आले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम