बचत गटांच्या उत्पादनांसाठी “मार्केटिंग प्लॅटफॉर्म” उपलब्ध करून देणे काळाची गरज

बातमी शेअर करा

खासदार उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन

खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | कोरोनाच्या महामारीनंतर बचत गटांमध्ये उत्पादन बनवण्याची स्पर्धा सुरू आहे.महिला भगिनींनी अतिशय दर्जेदार उत्पादने, खाद्यपदार्थ, विविध शोभेचे वस्तू तयार केल्या आहेत. आज जवळपास सर्व स्टॉलला भेट दिल्यावर महिलांमधील कलाकुसर दिसून येत असून त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना खऱ्या अर्थाने विक्रीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज असून आज नाबार्ड माध्यमातून पाच दिवस दिवाळी महोत्सवातून ही बाब पुर्ण होत असल्याचा आनंद आहे. असे गौरोद्गार खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

आज केंद्र सरकारच्या माध्यमातून नाबार्ड यशोदा हॉल, रिंग रोड ,जळगाव येथे दि. 13 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत पाच दिवसीय दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. या महोत्सवाचा समारोप करण्यात आला. सुरुवातीला नाबार्डचे जिल्हा प्रबंधक श्रीकांत झांबरे यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे स्मृतिचिन्ह शाल देऊन स्वागत केले

या महोत्सवामध्ये जिल्हाभरातील तसेच इतर काही जिल्ह्यातील 60 पेक्षा अधिक बचत गट सहभागी झाले.

खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की माझ्या माता भगिनी यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू व खाद्यपदार्थांसह शोभेच्या वस्तू तयार केलीत विक्रीला जळगावकर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यांचा आनंद असुन कोरोना कालावधीनंतर बचत गटाच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठा प्रतिसाद लाभत असल्याने बचत गटांमध्ये समाधान आहे .ग्राहकांना देखिल बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती वस्तू उपलब्ध झाल्यामुळे खरेदीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी सहभागी बचत गटांना प्रमाणपत्राचे वितरण खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक नाबार्डचे जिल्हा प्रबंधक श्रीकांत झांबरे यांनी तर आभार चेअरमन अनिकेत पाटील यांनी व्यक्त केले. खासदार उन्मेश पाटील यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन बचत गटाच्या माता-भगिनींशी संवाद साधला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like