बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ;किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ |बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून 22 ऑक्टोबरपर्यंत ते चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 48 तासांत दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र प्रभावी ठरू शकते. त्यानंतर ते पश्चिमेकडे सरकेल. 22 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. यामुळे ओडिशा सरकारने 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. याशिवाय किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम