आव्हाने शिवारातून दोन गाय वासरूची चोरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | तालुक्यातील आव्हाणे शिवारातून रस्त्यालगत बांधलेले दोन गाय आणि वासरु चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात कृष्ण कॉलनीत राजेंद्र देवाभाई भरवाड वय २८राह्त असून त्यांच्या मालकीच्या दोन गायी व एक वासरु त्यांनी जिजाऊनगर भागात मोकळ्या जागेत बांधलेली होती. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोन्ही गाय व वासरु दिसून आले नाही. सर्वत्र पशोध घेतला असता वाहनातून अज्ञात व्यक्तींनी गुरे चोरुन नेल्याची माहिती मिळाली. यानंतर याबाबत राजेंद्र भरवाड यांनी तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक दिनेश पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like