धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण
खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | पायी चालत असताना तरुणाचा धक्का लागल्याने त्याला मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित भिकन शिरसाठ (वय-२१) रा. अण्णाभाऊ साठे नगर,चाळीसगाव हा तरूण १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रोहित हा त्याच्या घराजवळून जात असतांना नंदू भास्कर शिरसाठ याला चालतांना धक्का दाखला. याचा राग आल्याने नंदू शिरसाठ आणि बजरंग नंदू शिरसाठ या दोन्ही भावांनी रोहित याला लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली तर दुसऱ्याने तोंडावर विट फेकून मारली. यात रोहित जखमी झाला असून त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आरोपी नंदू भास्कर शिरसाठ आणि बजरंग नंदू शिरसाठ यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम