महिलेच्या हातातून मोबाईल लांबविला ; जळगावातील घटना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातून २७ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती हिसकावून पोबारा केल्याची घटना मुळजी जेठा महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या मागे असलेल्या रस्त्यावर घडली रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराधना कॉलनी, नवीन पोस्टल कॉलनी येथील रहिवाशी लीना वासुदेव चौधरी (वय-52, )ह्या गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी पायी जात असताना मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाजवळ अज्ञात एका चोरट्याने त्यांच्या हातातील २७ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली .
त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख पुढील तपासकरीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like