संयुक्त पथकाने रसायनयुक्त दुधाचा कारखाना केला उद्‌ध्वस्त

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | जळगावात चोपडा तालुक्यात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक व अन्न- औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाई करण्यात आली. तर गुरुवारी रसायनयुक्त दुधाचा कारखाना उद्‌ध्वस्त केल्यानंतर या प्रकारातून अनेक भेसळयुक्त प्रकार समोर आले आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर- पाटील यांच्यासह अन्न- औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखा अशा तिघा यंत्रणांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी बिडगाव (ता. चोपडा) येथे दाखल झाले. एका शेतात रसायनयुक्त दूधनिर्मितीच्या कारखान्यावर कारवाई केली. पामतेल व दुधाची भुकटी या मिश्रणातून तयार होत असलेले हे दूध जळगावसह उत्तर महाराष्ट्रात वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यातून समोर आला.

बिडगाव येथे विशेष पथकाच्या कारवाईत रसायनाद्वारे निर्मित दुधाचा कारखाना नष्ट करण्यात आल्यामुळे आपण नेमके कोणत्या प्रकारचे दूध घेतो? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अशाप्रकारच्या दुधाच्या गोरखधंद्यातून थेट नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले. परंतु उध्वस्त केलेला दुधाचा कारखाना या कारवाईत सातत्य हवे, अशी अपेक्षाही सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like