डिझेल पेट्रोलच्या दरात एका आठवड्यात ३.२० रूपयेची वाढ
खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा एका वाढ झाली आहे. नागरिकांना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही दिलासा मिळताना दिसत नाहीये. पेट्रोल डिझेल आणि सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ल्या केल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कच्चे तेल १३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. जळगाव पेट्रोल ११३.४१ रूपये. तर डिझेलचा दर ९६.१७ रूपये इतका आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ केली आहे. या आठवड्यात पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत.म्हणजेच पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागले आहे.मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 113 रुपये 35 पैसे प्रतिलिटर इतका आहे. तर, डिझेलच्या दरातही 85 पैशांनी वाढ झाली आहे.
जळगाव ११३.४१ \ ९६.१७
बीड ११५.०१९७\ .७२
बुलढाणा ११३.७७ \ ९६.५३
चंद्रपूर ११३.४५ \ ९६.२४
धुळे ११३.०८\ ९५.८६
गडचिरोली ११४.२९ \ ९७.०५
गोंदिया ११४.५५ \ ९७.२८
बृहन्मुंबई ११३.३५ \ ९७.५५
हिंगोली ११४.०१\ ९६.७७
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम