सोने चांदीच्या किमतीत वाढ, लवकर खरेदी करा
खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. देशातील सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. शनिवारी 26 मार्च रोजी देशात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शुकरवारी जागतिक पातळीवर वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.
जळगावात सराफा बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. शुक्रवारी सोने प्रति दहा ग्रॅम ७४ रुपयांनी महागून ५१८९२ रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले. यापूर्वी गुरुवारी सोन्याचा भाव 51818 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी 827 रुपयांनी महागली आणि 68691 रुपये प्रति किलोवर बंद झाली. गुरुवारी चांदीचा भाव 67864 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला.
सोन्यासारख्या मौल्यवान धातुच्या किमती देखील वाढल्या आहोत. दरम्यान येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.जागतिक परिस्थितीत सोने पुन्हा एकदा 56 हजारांचा टप्पा पार करील असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम