जळगावातून वृद्ध महिलेच्या हातातील पिशवीतून दोन लाखांचे दागिने लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | तालुक्यातील कठोरा येथे राहणाऱ्या महिलेच्या हातातील कापडी पिशवीमधून अज्ञात चोरट्याने दोन लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लांबविल्याची घटना सुभाष चौक परिसरात 22 रोजी घडली असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशोदा संतोष कोळी (वय-७०) या कठोरा गावातील निवासी असून त्या २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३०वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील सुभाष चौकातील सुभाष डेअरी समोर या ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेल्या होत्या. दरम्यान त्यांच्याजवळ कापडी पिशवीत २ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविला. शेवटी गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता वृद्ध महिला यशोदा कोळी यांनी शनिपेठ पोलिसांत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हाच दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस जाधव करीत आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like