जळगावातील हॉस्पिटलकडून ५ लाखांची खंडणी मागणाऱ्याविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या हॉस्पिटल कडून बिल कमी करून देण्याच्या कारणावरून आणि वर्तमानपत्रात बातमी छापून बदनामी करू अशी धमकी देऊन ५ लाखांची खंडणी मागणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदीर कादिर खान (वय-३४) यांच्या मालकीचे सारा हॉस्पिटल दंगलग्रस्त कॉलनीत आहे. १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शोहेब पटेल रा. नाचनखेडा ता. जि. जळगाव यांनी वर्तमानपत्रात खोटी माहिती देऊन तसेच २३ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी अनोळखी २ जणांनी हॉस्पिटलमध्ये येऊन धमकी देत डॉक्टराकडून ५ लाखाची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास प्रसारमाध्यमांमध्ये बदनामी करू, अशी धमकी दिली. याबाबत मुदीर कादिर खान यांनी गुरुवार २७  रोजी  एमआयडीसी पोलीस स्टेशनला शोहेब पटेल यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like