जळगावात पायी चालणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र लांबवीले
खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ |रस्त्याने पायी चालणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील मंगलपोत धूमस्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यानी चोरून नेल्याची घटना २७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात घडली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजया दिलीप पाटील (वय-६०) रा. साई विहार कॉलनी, चंदू अण्णा नगर,ह्या गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास वृद्ध महिला या रस्त्यावरून पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत हिसकावीत पळ काढला . विजया पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम