भाऊबीजेला बहिणीच्या घरी आलेल्या तरुणाचा नदी पात्रात बुडून मृत्यू

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी आलेल्या भावाचा चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथे नदीपात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी घडली असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल सुरेश चौधरी (वय -१७) रा. श्रीराम नगर, सिंधी काॅलनी, जामनेर रोड, पाचोरा हा तरुण वालझिरी (चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान, नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता अचानक राहुल याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्या नागरिकांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी राहुल यास मृत घोषित करताच कुटुबिंयांनी एकच आक्रोश केला . राहुल चौधरी याच्या पश्चात आई, बहिण, पाहुणे असा परिवार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम