नशिराबादच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | घरातील झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन २८ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना  तालुक्यातील नशिराबाद येथे घडली असून विनोद पंढरी बिऱ्हाडे (वय-२८) रा. भवानी नगर, नशिराबाद असे मृत युवकाचे नाव आहे.
विनोद बिऱ्हाडे याने २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घरी कुणीही नसतांना घरातील झोक्याच्या दोरीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल नुर खान करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like