रोटरी क्लब जळगावने साजरी केली वंचितांसोबत दिवाळी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | येथील रोटरी क्लब जळगावच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकीतून समाजातील विविध घटकांची दिवाळी आपल्या दातृत्वातून साजरी केली. समाजातील गरजू व वंचित घटकांना रोटरीच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य केले जाते. दिवाळीच्या निमित्ताने ज्येष्ठ सदस्य कंवरलाल संघवी यांच्या पुढाकाराने व सहकार्याने रेल्वे स्टेशनवरील हमाल बांधवांना मिठाई व नमकीन देऊन दिवाळी साजरी केली. तसेच जळगावच्या निरीक्षण गृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना कॅप्टन मोहन कुळकर्णी यांच्या पुढाकाराने सदस्यांच्या सहकार्याने मिठाई, नमकीन देण्यात आले व सोबत फटाके फोडत दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला. विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य रोटरी सदस्यांना आनंद व समाधान देणारे होते.

त्यानंतर खडके (ता. एरंडोल) येथील बालसुधार गृहातील विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. डॉ. जयंत जहागीरदार, नितीन विसपुते व संदीप शर्मा यांनी भेट देऊन संस्थेची यासाठी निवड केली होती. संस्थाचालकांशी चर्चा करतांना दोन महिन्यांसाठी आवश्यक असलेले गहू देखील यावेळी देण्यात आले.
रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुलकर्णी, सदस्य मनोज जोशी, योगेश गांधी, दिलीप जैन, सुभाष अमळनेरकर, सुबोध सराफ, मुकेश महाजन, पंकज व्यवहारे, रेल्वेचे अधिकारी वर्ग, संस्थांचे शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like