बंद दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ | बंद दुकान फोडून रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर चोरुन नेल्याचा प्रकार रावेर तालुक्यातील रसलपुर येथे समोर आला आहे. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश उर्फ नंदू लक्ष्‍मण महाजन (वय-४६) रा. रसलपुर ता.रावेर यांचे योगेश्वर ट्रेंडर्स नावाचे गावातच दुकान आहे. १५ नोव्हेंबर रात्री आठ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा मागचा दरवाजा तोडून दुकानातील २ हजार रुपयांची रोकड आणि ८ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला. हा प्रकार बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक जगदीश पाटील पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like