मुक्ताई नगरात मेडिकल फोडले
खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ रुग्णालयातील मेडीकल दुकान फोडून गल्ल्यातून तीन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वात्सल्य बाल रुग्णालय हे डॉ. शिवाजी एकनाथ चौधरी यांचे आहे. या ठिकाणी डॉक्टरकीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन जणांनी रुग्णालयाचा खिडकीचा लॉक ब्रेक तोडून आत प्रवेश करत मेडिकल दुकानातील गल्ल्यातून ३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे. डॉ. शिवाजी चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहम्मद तडवी पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम