‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या 500 जणांची नोंदणी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ | जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. त्याने मद्य, गुटखा, तंबाखू सेवन करू नये त्यांचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवलेली आहे.

त्यात वेळोवेळी सहकाऱ्यांच्या विशिष्ट वयानंतर शारिरीक तपासण्या, आरोग्य विषयक मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शिबीराचे आयोजन केले जाते. शहरातील इतर आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये कंपनीचे सहकारी हिरीरीने सहभागी होत असतात. अलीकडेच कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडीया यांचे ‘प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजले होते. या उपक्रमाचा जळगाव शहरातील व्यक्तींनाही लाभ घेता यावा यासाठी शहरात देखील डॉ. कापडीया यांचे हृदय रोगाविषयी व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला होता..

ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सजगता व सामाजिक बांधिलकीने जैन इरिगेशनचे 500 सहकाऱ्यांच्या या खान्देश रनमध्ये सहभागी होत आहेत.

गत सहा वर्षांपासून जळगाव रनर्स ग्रुपच्या पुढाकाराने ‘खान्देश रन’ आयोजित करण्यात येत आहे. जळगावकरांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी होतो. या वर्षी 4 डिसेंबर 2022 ला खान्देश रनचे 6 वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जळगावकरांच सक्रिय पाठबळ असावं- अशोक जैन, चेअरमन जैन इरिगेशन
सर्वप्रथम कान्हदेश रनच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा, निरामय आरोग्यासाठी विविध क्रियांपैकी धावणे हे एक उत्तम माध्यम आहे, नक्कीच प्रत्येकाने ही सवय अंगिकारली पाहिजे. निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी यासाठी कान्हदेश रन च्या माध्यमातून होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत!
यावर्षीआमच्या जैन उद्योग समूहाचे जवळपास 500 सहकारी असतील, जळगाव करांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like