पैसे मागण्याच्या कारणावरून तरुणावर चॉपरने वार
खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ | उसनवारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून तरुणावर चॉपर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याबाबतचौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायपूर कुसुंबा येथे पंकज साळुंखे (वय-३२) हे राहत असून त्यांच्या शेजारी प्रमोद सोनवणे हे राहतात. तीन महिन्यांपुर्वी पंकज साळुंखे यांनी प्रमोद सोनवणे १ हजार रुपये उसणवारीने दिले होते. सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता उसनवारी दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून पंकज साळुंखे यांच्या पत्नी दिपाली हिला प्रमोद सोनवणे याने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी पंकज साळुंखे गेला असता प्रमोद सोनवणे, तुषार प्रमोद सोनवणे, नकुल प्रमोद सोनवणे आणि कविता प्रमोद सोनवणे या सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तर प्रमोद सोनवणे याने त्यांच्या हातातील चॉपरने पंकज साळुंखे याला गंभीर दुखापत केली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपी प्रमोद सोनवणे, तुषार प्रमोद सोनवणे, नकुल प्रमोद सोनवणे आणि कविता प्रमोद सोनवणे सर्व रा. रायपूर कुसुंबा ता. जि. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुधीर साबळे पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम