वृद्धाच्या पिशवीतून ४५ हजार लांबवीले
खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ | भडगाव शहरातील स्टेट बँकेत कामानिमित्त आलेल्या एका वृद्धाच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने ४५ हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव शंकर पाटील (वय ७५) हे दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास भडगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेत कामानिमित्त गेले होते. या ठिकाणाहून अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील पिशवीतून ४५ हजार रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी भडगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून स.फौ.संजय काळे पुढील तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम