नशिराबाद येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह | १७ नोव्हेंबर २०२२ | जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे डोळ्यात औषध टाकण्याचे बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ६० वर्षीय वृद्धा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित हेमराज भोजू चौधरी (वय ६०) याने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस डोळ्यात औषध टाकण्याचे बहाणा करुन तिला घरी बोलावुन घेतले. यानंतर हेमराज चौधरी याने पिडीत मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम