एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात होणार वाढ

बातमी शेअर करा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रावातामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले हाेते. त्याचा प्रभाव म्हणून पाच दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि काेकण, गाेव्यावर अवकाळी पावसाचे ढग जमले हाेते. मागील काही दिवसापासून राज्यातील विविध भागासह उत्तर महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे.

हे सावट आज शनिवारपर्यंत कायम राहणार असून उद्या रविवारपासून राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नाेंदवले गेले. त्यात आठवड्यात तीन अंशांनी वाढ हाेण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळांची तीव्रता वाढली हाेती.२६ मार्चपर्यंत तापमानात कोणताही चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

२७ मार्चनंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होणार आहे. २७मार्चनंतर पुन्हा तापमान ३७ ते ३८ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानही २० अंशांच्या आसपास राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होणार आहे. पारा ३९ किंवा ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like