मल्लखांब स्पर्धेसाठी जळगाव संघात प्रज्ञा मालपुरेची निवड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | आज जगभरात महीला आघाडीवर कार्यरत आहेत. असाच एक अभिमानास्पद बाब आज जळगावात घडली. केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची खेळाडू प्रज्ञा मालपुरेची 03 ते 06 एप्रिल 2022 दरम्यान मल्लखांब स्पर्धेसाठी कबचौ विद्यापीठ जळगाव संघात निवड करण्यात आली आहे.

प्रज्ञा मालपुरेचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री.खुशाल दास विद्यापीठ, हनुमानगढ, राजस्थान येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ रोप मल्लखांब स्पर्धेसाठी कबचौ विद्यापीठ जळगाव संघात निवड करण्यात आली आहे. महिला विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि विजयही मिळवतात.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक राणे, IQAC समन्वयक डॉ. शैलजा भंगाळे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, प्रा.प्रविण कोल्हे, प्रा.अतुल गोरडे,प्रा.पंकज पाटील, डॉ. गणेश पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like