जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड तंत्रनिकेतनात विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल विझिटचे
खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | कोरोनाचे सावट असल्याने दोन वर्ष विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आणि इंडस्ट्रियल व्हिजिट असे अनेक उपक्रम करण्यात अडचणी होत्या.जळगावात केसीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्पुटर इंजिनीरिंग विभागातर्फे जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड जळगाव येथे तंत्रनिकेतनाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल विझिटचे आयोजन करण्यात आले.
यावर्षी करून आतून निर्बंध कमी केल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसह राबविण्यात आला आहे. यात ब्रिकेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे ज्ञान दिले, तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सदरील इंडस्ट्रियल विझिट प्रा.काजल विसराणी आणि योगेश फेंगडे यांनी आयोजित केली. प्रत्यक्षात घेतलेल्या शिक्षणात विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होतो तसेच त्यांच्या अनेक गोष्टींचे निरसन देखील केले जाते.
ही भेट विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी खूप फायदेशीर ठरली. या विझिट दरम्यान विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फौंडेशनलाही भेट दिली. आनंद आणि उत्साह तसेच शिक्षणाबद्दल असणारी आवड यात पाहायला मिळाली
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम