पोलिस दलाची उडाली खळबळ, दशहतवादी शिरल्याची माहिती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | भुसावळ रेल्वे स्थानकात तीन दशहतवादी शिरल्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळताच यंत्रणा अलर्ट झाली. काही क्षणात पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिका, अग्निशमन दल व लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाची अधिकारीही मोहिमेसाठी सज्ज झाले.

भुसावळ जंक्शन स्थानकावर एका खोलीत तीन अतिरेकी शिरल्याची माहिती पोलिस प्रशासनाने शुक्रवारी सकाळी 9.15 वाजता कळताच पोलिस दलात खळबळ उडाली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, परीवेक्षाधीन सहा.पोलिस अधीक्षक आतीश कांबळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक, जीआरपी व आरपीएफ यांचे अधिकारी धावून आले.

क्युआरटी पोलिस पथक, आरसीपी प्लॉटून पथक, श्वान पथकासह स्थानिक पोलिस व अधिकारीही मोहिमेसाठी सज्ज झाले. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रशिक्षीत कमांडो टीमला सूचना करताच यंत्रणा कामाला लागली व काहीच वेळात एका अतिरेक्याचा खात्मा (अ‍ॅक्शन) व दोघांना ताब्यात घेवून यंत्रणा बाहेर पडली. रेल्वे स्थानकावर अतिरेकी शिरल्याची माहिती प्रवाशांसह उपस्थितांना कळताच त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.

मात्र प्रत्यक्षात सुरक्षा यंत्रणांची कामगिरी तपासण्यासाठी हे मॉकड्रील असल्याचे कळताच प्रत्येकाने सुटकेचा श्वास घेतला. मॉक ड्रील कळताच भांड्यात पडला जीव जंक्शनच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा ताफा पाहून प्रवाश्यांमध्ये खळबळ उडाली व नेमके काय झाले कोणालाही काही कळत नव्हते मात्र अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like