जळगावात सांबरी नाटकाने पटकावलं प्रथम पारितोषिक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | १८व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून विद्या फांऊडेशन संस्थेच्या सांबरी या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

दि.२२ मार्च व २३ मार्च या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गोविंद गोडबोले (सांगली), नवीनी कुलकर्णी (मुंबई) आणि सुषमा मोरे (नागपूर) यांनी सर्व कार्यक्रम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे व जळगाव केंद्र समन्वयक दिपक पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रवीण गुरव (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक अमोल ठाकूर (नाटक-सहल). तर महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ या संस्थेच्या गुणांच्या सावल्या या नाटकास द्वितीय पारितोषिक पारितोषिक प्राप्त झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक उषा चोरघडे (नाटक- बंद पुस्तक), द्वितीय पारितोषिक अजय पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पियुषा महाजन (नाटक- नाते तुझे नी माझे) व रुपेश पाटील (नाटक-भूत),

नेपथ्य : प्रथम पारितोषिक विकास बाटुंगे (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक मोहिनी पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक मनोहर यादव (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक कपिल गायकवाड (नाटक – द बटर फ्लाईज), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नीलाक्षी सदानाईक (नाटकमामाचं पत्र हरवल), आयुषी पाटील (नाटक-कॉपी बहादूर), स्वराली जोशी (नाटक-मॅडम).

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like