राज्यातील ढगाळ वातावरणामुळे कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर होत आहे. वर्षभर निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपिकांचे नुकसान झाले आहे.

आता काढणी दरम्यानही हे नुकसान अटळ असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. हवामान विभागाने मुंबईत हलक्या पावसाच्या सरींचा इशारा तीन दिवसांपूर्वी दिला होता. मुंबईसह ठाणे, रायगड आदी परिसरातही ढग दाटून आले होते. आज विदर्भातील काही भाग वगळता जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेले ढग जमल्याचे दिसले.

मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मंगळवारी राज्यभर ढगाळ वातावरण होते. आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने काढणीवर आलेला रब्बी हंगामात नुकसानीची भीती आहे. जळगाव जिल्ह्यात काल ढगाळ वातावरणाने तापमान २ अशांनी घसरून ४१ अंशांपर्यंत खाली आले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अंदामान बेटांवर असानी चक्रीवादळ दाखल झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असता तरी जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नगण्य आहे. असे असले तरी दोन-तीन दिवसांत ढगाळ वातावरण निवळून शनिवारपासून तापमान पुन्हा वाढेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like