ट्रकच्या अपघातात शाळकरी मुलाचा झाला मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | जळगाव शहराकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.

मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात शिकत होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे शाळेतून त्याला दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएम.१११ ने राजू गवळी हा घेऊन येत होता. लांडोरखोरी उद्यानाच्या पुढे उतरती मार्गावर समोरून ट्रक क्रमांक एमएच.२८.बी.७७०३ हा आरटीओ ट्रॅकहून परतत होता. उतरतीवर ट्रकच्या चाकाखाली आल्याने सुजय सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने लागलीच पळ काढला.

मयत सुजय हा जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा नातू व उपसरपंच गणेश सोनवणे यांचा मुलगा होता.
सुजय मोहाडी येथील रहिवासी असल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. मृत सुजयच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like