पुष्पा ठाकूर अड्डयावरील दारू पिल्याने इसमला झाल्या रक्ताच्या उलट्या
खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | जळगाव शहरात दि.१६ रोजी रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या इसमाने दुपारी मंगलपुरी भागात पुष्पा ठाकूर यांच्या अड्ड्यावर दारू पिल्याने रक्ताची उलटी झाल्या. त्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत फिर्याद दाखल केली असून महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
रामेश्वर कॉलनीत राहणारे अमर रमेश भोळे वय-३२ यांना दारू पिण्याची सवय असल्याने दि.१६ मार्च रोजी दुपारी दारू पिण्यासाठी मंगलपुरी भागातील पुष्पा ठाकूर अड्ड्यावर गेले. त्याठिकाणी काम करणाऱ्या प्रकाश नावाच्या मुलाने त्यांना सांगितले कि मी मोहाची दारू आणलेली आहे. त्याने दारूच्या बाटलीत ती दारू टाकून पिण्यास सांगितले.
दारू पिल्यानंतर अमर भोळे यांना रक्ताची उलटी झाली. त्यानंतर ते घरी येऊन झोपले असता त्यांना पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्या. कुटुंबियांनी अमर भोळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोदावरी हॉस्पिटल येथे पाठविले. प्रकृती अस्तावस्त असल्याने काही दिवस ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
२/३ दिवसांत पूर्ण शुद्दीवर आल्यानंतर अमर भोळे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुष्पा ठाकूर या महिलेला अटक केली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम