सरकारने केली मोठी घोषणा, 31 मार्चपासून सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगणार आहे. याच पार्श्वभूमीवर, सरकारने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्बंध हटवण्याचा निर्णय घेत असताना आरोग्य मंत्रालयाने स्थानिक परिस्थितीनुसार प्रशासनाला काही अधिकार दिले आहेत. ‘जर एखाद्या राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली तर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते राज्य निर्णय घेऊ शकते,’ असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला. मात्र, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम लागू राहतील. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबतचा निर्णय घेतला.

येत्या काही दिवसात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच आता केंद्राने कोरोना निर्बंध हटवण्याने कोरोनाचा धोका वाढण्याची देखील शक्यता आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून यामुळे लादलेले सर्व निर्बंध 31 मार्चपासून रद्द केले जात आहेत. त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like