अनेक दिवसांनतर सोने आणि चांदीच्या भावात घसरण, 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कालच्या दरवाढीनंतर आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.कारण रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या भावाला ब्रेक लागला आहे.

आज जळगाव सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याच्या भावात २९० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी ६७० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने २२० रुपयाने तर चांदी ४८० रुपयाने महागली होती. आज बुधवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,५८० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,२८० रुपये प्रति किलो इतका आहे.

सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. रशियाच्या या निर्णयामुळे देशांतर्गत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आता दोन्ही धातूंचे दर घसरू लागले. गेल्या आठवड्यात सोने दरात जवळपास १७०० ते १८०० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात जवळपास २१०० रुपयाची घसरण झाली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like