पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८३ पैशांनी होणार वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | पेट्रोल-डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल प्रत्येकी ८३ पैशांनी महागणार आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत.पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज असून ट्रान्सपोर्टेशन खर्च वाढण्याची शक्यता आहे.

 

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वरच आहेत.मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज जळगावात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर जवळपास ११३ रुपये इतका झाला आहे. तर डिझेलचा प्रति लिटरचा दर ९५ रुपायांवर गेला आहे.

 

युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ११४ डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.मुंबईत सध्या पेट्रोल ११०.८२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९५.०० रुपये प्रति लीटर आहे. त्यामुळं या महागाईमुळं अनेकांनी सार्वजनिक प्रवासाला महत्त्व देत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

गोंदिया ११२.८६ ९५.६१

बृहन्मुंबई १११.८५ ९६.०३

हिंगोली ११२.७५ ९५.५०

जळगाव १११.६६ ९४.४४

जालना ११३.६५ ९६.३४

कोल्हापूर १११.३३ ९४.१४

लातूर ११२.५३ ९५.२८

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like