शहरातील ‘चील्या’ चोरट्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | जळगाव शहरात मोबाईल व दुचाकी चोरी करणारा सराईत युसूफ शेख उर्फ चील्या याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तो ३ बालकांच्या मदतीने चोरीमारी, दरोडा, फसवणूक करत होता.

महिन्याभरापासून जळगाव शहरात मोबाईल स्नॅचींग, घरफोडी व मोटार सायकलचोरीच्या गुन्ह्यात वाढ होते. या सर्व गोष्टींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्ह्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करुन गारांचे छडा लावण्याचे काम हाती घेतले. याकरिता गुन्हे शाखेचे पोलिसांसह पोलिस अधिकारी सपोनि जालींदर पळे, सफौ युनुस शेख,इतर देखील यात सहभागी झाले.

पथक शहरात फिरुन गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढत असतांना पो. नि. किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. ते शिवाजी नगर भागात राहतात. युसुफ शेख उर्फ चिल्या ( रा. शिवाजी नगर हुडको ) व त्याचे साथीदार यांनी शहरात मोबाईल स्नॅचींगचे गुन्हे केल्याची बातमी मिळाली. ही माहिती कळताच पथक शहरात हाजीर झाले सापळा रचून पथकाने शिवाजीनगर भागात फिरून आरोपीची माहिती काढली. या पथकाला काही मेहनतीनंतर यश मिळाले. आरोपी युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख यास ताब्यात घेतले होते.

पोलीस पथकाने ताब्यात घेतल्यानंतर तपासादरम्यान विचारपूस केली असता पोलीस निरीक्षकांना विशेष माहिती मिळाली. आरोपी युसुफ शेख याने व त्याचे ३ साथीदार अल्पवयीन बालक यांनी मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी युसुफ शेख याच्याकडून विविध ७ गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जालींदर पळे करीत आहेत.

पोलीस पथकामध्ये गुन्हे शाखेचे पोलिसांसह अधिकारी सपोनि जालींदर पळे अशोक महाजन, पोह सुनिल दामोदरे, पोह विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, पोना अविनाश देवरे, रविंद्र पाटील, दिपक शिंदे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, चालक सफौ राजेंद्र पवार यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like