गिरणा पंपिंग येथे गुराख्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यु
खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | जळगावात गिरणा पंपिंग परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा डोहात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खालील गरीब घरातील गुराख्याचा नदीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रा. सावखेडा, ता. जळगाव केशव शंकर इंगळे वय ५५ . आपली उपजीविका करण्यासाठी शेती राखत काम करत असे. दि.१३ मार्च रोजी सकाळी गुरे चारण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. गरीब घरातील गुरेढोरे चोरून आपलं उपजीविका करणार हे कुटुंब होतं. दिवसभर गुरेढोरे चरून सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. गुरे देखील बेपत्ता होती आणि केशव चा ही काही ठावठिकाणा लागत नव्हता. कुटुंबातील लोक अस्वस्थ होती काहीच ठावठिकाणा लागल्याने मदत घेण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. यावर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली दुसऱ्या दिवशी केशव चा मृतदेह हाती लागला. सोमवारी (दि.१४) सकाळी ८ ला त्याचा मृतदेह गिरणा नदीपात्रातील फिल्टर प्लँट परिसरातील डोहात आढळून आला. घरातील कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंबांमध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे. .
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम